Top News

धरणगावचे लाडके सुपुत्रः आ. अभिजीत भाऊ पाटील यांची ऐतिहासिक निवड.

धरणगाव शहरासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे. *राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि पालकमंत्री म्हणून आ. गुलाबराव पाटील* यांची निवड झाल्याने शहराच्या महत्त्वात वाढ झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली धरणगावसाठी अनेक विकास प्रकल्प राबवले जातील, अशी आशा आहे.

या आनंदाला आणखी मोठी झळाळी मिळाली आहे ती आ. अभिजीतभाऊ पाटील यांच्या शासकीय PA म्हणून झालेल्या निवडीमुळे. धरणगावच्या या कर्तृत्ववान सुपुत्राने आज पुन्हा एकदा शहराला अभिमानास्पद स्थान दिले आहे.

अभिजीतभाऊंचा प्रेरणादायी प्रवास

आ. अभिजीतभाऊ पाटील हे केवळ शासकीय पदावर विराजमान झालेले व्यक्ती नाहीत, तर त्यांचे संपूर्ण जीवनच समाजसेवेची आणि कार्यक्षमतेची ओळख आहे. शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी भरीव कार्य केले आहे. त्याचप्रमाणे, माजी शहार अध्यक्ष आणि माजी स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांनी शहराच्या हितासाठी निस्वार्थ भावनेने काम केले आहे.

त्यांचा कार्यतत्पर आणि लोकाभिमुख दृष्टिकोन नेहमीच प्रभावी राहिला आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि धरणगावच्या विकासावरील दूरदृष्टीचा फायदा आता गावातील जनतेला  होणार

Post a Comment

Previous Post Next Post